ब्रेकिंग न्यूज़

धेंपो-साळगावकर लढत गोलबरोबरीत

>> गोवा प्रो-लीग फुटबॉल

धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने पिछाडीवरून दमदार उभारी मारताना दुसर्‍या सत्रात दोन गोल नांेंदवित साळगावकर फुटबॉल क्लबविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवित गुण विभागून घेतले.

बरोबरीमुळे धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचे २० सामन्यांतून ४८ गुण झाले ते गोलफरकाच्या आधारे अव्वल स्थानी पोहोचले आहेत. गोवन एफसी संघाचेही ४८ गुण झालेले असून ते दुसर्‍या स्थानी आहेत. परंतु त्यांनी धेंपोपेक्षा एक सामना कमी खेळलेला आहे. बरोबरीमुळे साळगावकर एफसी संघाचे २० सामन्यांतून ४५ गुण झालेले असून तेही जेतेपदाच्या शर्यतीत कामय आहेत.
डेंझिल रिबेलोने ८व्याच मिनिटाला गोल नोंदवित साळगावकर एफसीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३६व्या मिनिटाला रिभव सरदेसाईने गोल नोंदवित साळगावकर एफसीला मध्यंतरापर्यंत २-० अशा आघाडीवर नेले होते.

दुसर्‍या सत्रात धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने दमदार पुनरागमन करताना दोन गोल नोंदवित २-२ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. स्ट्रायकर ज्योकिम अब्रांचीजने धेंपो स्पोर्ट्‌स क्लबची पिछाडी २-१ अशी भरून काढली. तर नंतर जेस्सलने घेतलेल्या क्रॉसवरील चेंडू साळगावकरचा खेळाडू जेसन डिमेलोला लागून जाळीत जाऊन विसावल्याने धेंपोने २-२ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या अंतिम क्षणात ज्योकिम अब्रांचीजला धेंपोचा विजयी गोल नोेंदविण्याची संधी चालून आली होती. परंतु त्याने घेतलेल्या हेडरवरील चेंडू थोडक्यात बाहेर गेला.