‘दी हंड्रेड’मधील खेळाडूंचा करार रद्द

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ‘दी हंड्रेड या लीगसाठी करारबद्ध केलेल्या खेळाडूंचा करार रद्द केला आहे. काही दिवसांपूर्वीच ही बहुप्रतिक्षित स्पर्धा कोरोना विषाणूंंच्या कारणामुळे पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १७ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार होती, परंतु ही स्पर्धा आता पुढील महिने होणे अपेक्षित आहे. ८ संघाचा समावेश असलेल्या लीगमध्ये प्रत्येक सामना १००-१०० चेंडूंचा खेळवण्यात येणार आहे.

या लीगसाठी संघ निवड करण्यात आली होती. आता ही स्पर्धाच स्थगित झाल्यामुळे इसीबीने करार रद्दचे पत्र खेळाडूंना पत्र पाठवले आहे आणि त्यात खेळाडूंचा करार रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. परदेशी खेळाडूंवरील प्रवास बंदीमुळे या लीगमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सहभाग सध्यातरी ही स्पर्धा होणे अश्यक्य आहे. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी सांगितले की,‘सद्य परिस्थिती लक्षात घेता यंदा ही लीग होणे शक्य नाही. त्यामुळे नाईलाजास्तव करार रद्द करणे भाग पडले.