ब्रेकिंग न्यूज़

दहा कोटी रु. जमा करण्याचे कार्तींना आदेश

माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने मे व जून महिन्यात विदेशात जाण्यासाठी आधी दहा कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएक्स मिडिया व एअरसेल मॅक्सिस या प्रकरणांमध्ये असेलल्या आरोपांप्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
ईडी व सीबीआयतर्फे कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्धच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास केला जात आहे. त्यांनी गेल्या जानेवारीतही १० कोटी रुपये सर्वोच्च न्यायालयात जमा केले होते.