दहावी-बारावी निकालाबाबत आज वा उद्या घोषणा

बारावी इयत्तेचा निकाल आठवडाभरात होणार असून दहावी इयत्तेचा निकाल मात्र कधी होईल हे एवढ्यात सांगता येणार नसल्याचे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. आज किवा उद्यापर्यंत दहावी व बारावी इयत्तेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.

यंदा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात येणार असून पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जणार नसल्याचे मंडळाचे चअरमन सामंत यांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रसारामुळे बारावीच्या परीक्षेचे काही पेपर शिल्लक असताना पुढे ढकलण्यात आले होते.

तर दहावीची परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भामुळे बर्‍याच उशिरा घेण्यात आली होती. सामाजिक अंतराचे पालन करून शालांत मंडळाने दहावीची तसेच बारावीचे शिल्लक पेपर योग्य सुरक्षा बाळगून घेतले होते. उशिरा परीक्षा घेऊनही निकाल लवकर होणार आहे.