दहावीचा निकाल १० ते १५ जुलै दरम्यान

दहावी इयत्तेच्या परीक्षेची पेपर तपासणी अजून चालू असून दहावी इयत्तेचा निकाल येत्या महिन्याच्या १० ते १५ तारखेच्या दरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती काल गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी दिली. यंदा कोरोना आपत्तीमुळे परीक्षा खूपच विलंबाने झाल्या. त्यामुळे पेपर तपासणीचे काम अजून चालू असल्याचे ते म्हणाले. हे काम पूर्ण होऊन निकाल तयार करावा लागणार असून त्यामुळे तो जुलै महिन्याच्या १० ते १५ तारखे दरम्यानच होऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.