ब्रेकिंग न्यूज़

दहशतवादावरून मोदींचे पाकिस्तानला खडे बोल

आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या राष्ट्रांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले. याविरोधातील आपले संकुचित विचार सोडून मानवतावादी शक्तींनी पुढे आलेच पाहिजे, असे खडे बोल त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता किर्गिस्तानातील बिश्केक येथे सुनावले. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) दहशतवादाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादली.