ब्रेकिंग न्यूज़
थिवीतील पती – पत्नी दिल्लीत अपघातात ठार

थिवीतील पती – पत्नी दिल्लीत अपघातात ठार

माडेल, थिवी येथे राहणारे साबांखाचे निवृत्त अभियंते कुरियाकोस टी. झेव्हियर व त्यांची पत्नी सुमा यांचे काल सकाळी दिल्ली येथे रस्ता अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून आमला या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

कुरियाकोस बायको, मुली व नातीसह दिल्ली येथील नातेवाइकांकडे सहा दिवसांपूर्वी फिरायला गेले होते. काल सकाळी ते फा. अनीश यांची कार घेऊन आग्रा येथे निघाले होते. त्यावेळी सकाळी ६.३० वा. दिल्ली – आग्रा महामार्गावर त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात कुरियाकोस व त्यांची पत्नी सुमा जागीच ठार झाल्या. तर त्यांची मुलगी अमला मॉल डोक्याला गंभीर मार लागल्याने अत्यवस्थ आहे. मोठी मुलगी अतिथा तिची मुलगी अँजेलिना व फा. अनीश यांना किरकोळ दुखापत झाली. अमला हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच कुरियाकोस यांचे जावई व दोन मुलगे दिल्लीला रवाना झाले. कुरियाकोस मुळचे केरळ येथील असून नोकरीनिमित्त अनेक वर्षांपासून गोव्यात स्थायिक झाले होते.