‘त्या’ शिक्षकास अखेर तुरुंगवास

गोव्यात २०१२ साली गाजलेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणातून झालेल्या एका मुलीच्या आत्महत्याप्रकरणी रायबंदर येथील चित्रकला शिक्षक कन्हैया नाईक याला काल गोवा बाल न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची सजा ठोठावली.
कन्हैया हा शहरातील एका शाळेत चित्रकलेचा शिक्षक म्हणून काम करीत होता. आल्तिनो येथील एका मुलीचा लैंगिक छळ केल्याने सदर मुलीने अंगावर केरोसिन ओतून जाळून घेतले होते. त्यामुळे पणजी पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून बाल न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. त्याचा निवाडा काल जाहीर झाला.