ब्रेकिंग न्यूज़

तेरेखोल येथील गोल्फ कोर्स प्रकल्पाला स्थगिती

तेरेखोल, पेडणे येथील नियोजित गोल्फ कोर्स प्रकल्पाचे बांधकाम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. न्यायालयाने राज्य सरकारला उप जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार या प्रकरणी कोणतेही आदेश जारी करण्यास प्रतिबंध घातले आहे. लिडिंग हॉटेलला या आदेशाला आव्हान देण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच जनहित याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा याचिकादाराला दिली आहे.