ब्रेकिंग न्यूज़
तेंडुलकरांमुळे भाजपची  प्रतिमा डागाळतेय ः पार्सेकर

तेंडुलकरांमुळे भाजपची प्रतिमा डागाळतेय ः पार्सेकर

पेडणे (प्रतिनिधी)
आपण भापज प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या गैरकृत्यांविषयी बोललो असून त्याबाबत आपण ठाम आहे असे सांगून तेंडुलकर यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे भाजपची प्रतिमा खराब होत असल्याची टीका भापजचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. पक्षाची प्रतिमा टिकवण्यासाठी तेंडुलकरांनी अध्यक्षपदाचा राजिनामा द्यावा, असेही पार्सेकर म्हणाले.
तेंडुलकर खोटे बोलतात की दयानंद सोपटे याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी दोघांनीही एका व्यासपीठावर येऊन लोकांना सांगावे, असे आव्हानही पार्सेकर यांनी दिले.