ब्रेकिंग न्यूज़

तितली चक्रीवादळाचे आंध्र प्रदेशात ८ बळी

भुवनेश्‍वर/चेन्नई : आंध्र प्रदेशात काल तितली चक्रीवादळ धडकल्यानंतर राज्याच्या किनारी भागांमध्ये हाहाःकार उडाला. यामुळे ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आंध्र प्रदेशच्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेतर्फे देण्यात आली. ओडिशा राज्याच्या गंजम व गजपती या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात हानी केली. मात्र तेथे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आंध्रात मृत्यूमुखी पडलेल्या ८ जणांत ६ मच्छिमारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.