डेकसामेथासॉन’ औषध कोरोना रुग्णांचे जीव वाचवू शकते

>> इंग्लंडच्या शास्त्रज्ञांचा दावा

इंग्लंडमधील कोविड-१९ विषयक शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, कोविड-१९ चे जे रुग्ण इस्पितळात उपचार घेत असतात त्यांना कमी मात्रेत डेक्सामेथासॉन हे जेनरिक स्टेरॉईड औषध दिल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होते. या जीवघेण्या साथीचा तीव्र संसर्ग झालेल्या तीन रुग्णांपैकी किमान एक रुग्ण वाचू शकतो.

या शास्त्रज्ञांनी ‘रिकव्हरी’ नामक चाचण्या घेतल्यानंतर वरील दावा केला आहे. या भयंकर साथीचा संसर्ग झाल्याने इस्पितळात उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी वरील औषध प्रमाण मानून तातडीने दिले जावे असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

‘ज्यांना कोविड-१९ चा संसर्ग झाला आहे आणि त्यामुळे ते व्हेंटिलेटरवर आहेत किंवा प्राणवायूवर आहेत अशा वेळी त्यांना डेकसामेथासॉन हे औषध दिल्यास त्यांचा जीव वाचू शकेल आणि त्याचा खर्चही बराच कमी आहे. अशी प्रतिक्रिया ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेले व या चाचणीत योगदान दिलेले मार्टिन लँड्रे यांनी व्यक्त केली आहे.