ब्रेकिंग न्यूज़
डायस्टोनिक सेरेब्रल पाल्सीसाठी  यशस्वी उपचार

डायस्टोनिक सेरेब्रल पाल्सीसाठी यशस्वी उपचार

  •  डॉ. प्रदीप महाजन

बाळ जन्माला आले तेव्हा रडले नाही किंवा त्याने हालचालही केली नाही
बाळाला दोन महिन्यांने असताना आकडी येऊ लागली, त्याचे स्नायू ताठ व्हायचे आणि ते शांत झोपूही शकत नव्हते…
युगांडात जन्मलेल्या आरोनच्या आईला दीर्घकाळ व कठीण प्रसूतीकळांमधून (१० तासांहून अधिक काळ) जावे लागले. बाळंतपणानंतर आरोन रडला नाही किंवा त्याने काही हालचालही केली नाही. त्याला नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर तीन आठवडे उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत एका मर्यादेपर्यंत सुधारणा झाली पण बाळामध्ये स्तन्यपान घेण्यासाठी आवश्यक प्रतिक्रियांचा विकास होऊ शकला नाही. आरोन केवळ २ महिन्यांचा असताना त्याला आकडी येऊ लागली. ३-४ दिवस अंतरा-अंतराने त्याला आकडी येत राहायची. यात काही वेळा त्याचे स्नायू ताठ होऊन जातात, तर काही वेळा तो झटके देतो असे त्याच्या आईच्या निदर्शनास आले.

युगांडामध्ये आरोनच्या पालकांनी न्युरोलॉजिकल तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि त्याला डायस्टोनिक सेरेब्रल पाल्सी (हा विकासात्मक विकार असून, जन्मापूर्वी, मातेच्या प्रसूतीदरम्यान किंवा जन्माला आल्यानंतर काही वर्षांत ही अवस्था निर्माण होऊ शकते.) झाल्याचे निदान करण्यात आले. कन्व्हल्जन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच स्नायूंचा कडकपणा कमी करण्यासाठी त्याला औषधे देण्यात आली व फिजिओथेरपीही सुरू करण्यात आली. मात्र, त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नव्हता. विकासाचे टप्पे गाठण्यास त्याला विलंब लागत होता. बाळाला नीट झोप लागत नसे, सारखे प्रादुर्भाव (इन्फेक्शन्स) होत असत, अन्न गिळता येत नव्हते, नाक सतत बंद होत असे आणि तो हाक मारल्यास किंवा कोणत्याही आवाजाला प्रतिसादही देत नव्हता. आरोनला मुंबई येथील रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांना दाखवण्याचा सल्ला देण्यात आला.

डॉ. प्रदीप महाजन म्हणाले, पुढील तपासणी केल्यानंतर तीव्र न्युरोरिहॅब्लिटेशनसह पेशी-आधारित उपचारांची दोन सत्रे त्याला देण्याची योजना आखण्यात आली. हे उपचार घेतल्यानंतर त्याच्या स्नायूंचा ताठरपणा कमी झाला आणि आकडी येण्याची वारंवारताही कमी झाली. आकडीची तीव्रताही कमी झाली. आरोनच्या आईसाठी सर्वांत दिलासादायक बाब म्हणजे तो पूर्वीपेक्षा चांगले स्तन्यपान करू लागला आणि हाक मारली असता प्रतिसादही देऊ लागला.

ते म्हणाले, आरोनच्या शरीरातील बरे होण्याच्या अंगभूत क्षमतेचा उपयोग पेशी-आधारित उपचारांच्या माध्यमातून करून घेणे हा आमचा उद्देश होता. उपचारांसाठी वापरण्यात आलेल्या पेशी व वाढीचे घटक त्याच्याच शरीरातील (ऑटोलोगस) होते. त्याच्याच शरीरातील निरोगी पेशींचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे उपचार सुरक्षित व प्रभावी ठरले. पेशी तसेच वाढीचे घटक मेंदूत स्थलांतरित होऊ शकतात आणि दुखापतीनंतरच्या कार्यामध्ये सुधारणा घडवून आणतात. या पेशींना उत्तेजित करून न्युरॉनसारख्या पेशींमध्ये तसेच ग्लिअल पेशींमध्ये त्यांचे विभाजन केले जाऊ शकते. या रेणूंचे मज्जासंस्थेशी निगडित स्थितीमध्ये प्रत्यारोपण करण्यामागील यंत्रणेमध्ये पेशी बदल (रिप्लेसमेंट) कार्य किंवा न्युरोट्रोफिक प्रभावही समाविष्ट असू शकतो. याशिवाय, हे रेणू दुखापतग्रस्त भागातील रक्ताभिसरण सुधारतात आणि त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी (रिजनरेशन) आवश्यक असे सुक्ष्मवातावरण (मायक्रोएन्व्हॉर्न्मेंट) निर्माण करतात.

फिजिओथेरपी, न्युरोमस्क्युलर स्टिम्युलेशन, ऑक्सिजन थेरपी, योग, आहारातील बदल, न्युट्रासिटिकल्स आदी बाबीही यात महत्त्वाची सहाय्यक भूमिका बजावतात. आरोन बाळ आता त्याच्या शहरातही परत गेला आहे आणि हे संबंधित उपचार घेत आहे. त्याच्या अवस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे डॉ. महाजन म्हणाले.
पूर्वी आम्ही आरोनला हाक मारायचो तेव्हा किंवा अगदी गाणी लावली तरीही तो प्रतिसाद द्यायचा नाही. मात्र आता तो गाण्याच्या दिशेने वळून बघतो आणि हालचाल करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी माझे आयुष्यही खूप कठीण झाले होते. आरोन सतत रडत राहायचा, त्यामुळे मीही शांतपणे झोपू शकत नव्हते. पण आता त्याचे रडणे थांबले असल्याने मीही शांत झोपू शकते. त्याच्या स्नायूंमधील समन्वय व मेंदूची कार्यात्मकता सुधारली आहे; त्याच्या सुक्ष्म स्नायूंच्या हालचाली विकास पावत आहेत, तो ताठ बसतो आणि अन्न गिळू शकतो. शिवाय, त्याला जेव्हा रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्याचे वजन १० किलो होते, आता ते १३ किलो झाले आहे. त्याच्या आयुष्याचा दर्जा सुधारल्याबद्दल मी आनंदी आहे आणि डॉ. महाजन व त्यांच्या पथकाची खूप आभारी आहे, असे आरोनची आई म्हणाली.