टीम इंडिया लंडनमध्ये दाखल

टीम इंडिया लंडनमध्ये दाखल

म इंडिया काल २२ मे रोजी मुंबई येथून  आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी लंडनला रवाना झाली. काल उशिरा भारतीय संघ लंडन दाखल झाला. ३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेटच्या या महाकुंभात भारताच्या अभियानाची सुरुवात ५ मे रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीने होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने १०८३साली कपिल देव याच्या तर २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जगज्जेतेपद प्राप्त केले होते.
२१ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने यंदाचा विश्वचषक हा टीम इंडियासाठी सर्वांत ‘चॅलेंजिंग’ असेल असे स्पष्ट केले होते. तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी याची भूमिका भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले आहे.
साखळी फेरीत भारतीय संघ एकूण ९ सामने खेळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ दोन संघांशी सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना २५ मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सराव सामना बांगलादेशशी २८ मे रोजी होणार आहे.
आज २३ रोजी भारतीय संघ विश्रांती घेणार आहे. २४ रोजी ओव्हल मैदानावर पहिले पूर्ण सराव सत्र होणार आहे.
१५ सदस्यीय टीम इंडिया ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.
भारतीय संघाचे साखळी फेरीतील वेळापत्रक 
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार
दु. ३ वाजता सुरू होतील)  ः
५ जून विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ९ जून विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १२ जून विरुद्ध न्यूझीलंड, १६ जून विरुद्ध  पाकिस्तान, २२ जून विरुद्ध अफगाणिस्तान, २७ जून विरुद्ध वेस्ट इंडीज, ३० जून विरुद्ध  इंग्लंड, २ जुलै वरुद्ध  बांगलादेश, ६ जुलै विरुद्ध श्रीलंका.