ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोना; केजरीवालांचा अहवाल निगेटिव्ह

 

कॉंग्रेस सोडून काही काळापूर्वीच भाजपवासी बनलेले ज्योतिरादित्य शिंदे व त्यांची आई माधवी राजे शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून उपचारांसाठी त्यांना येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याआधी भाजपचे प्रवक्ते संबित पात्र यांनाही कोरोना संसर्गामुळे इस्पितळात दाखल केले होते.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ताप आल्याने व घसा दुखत असल्याने ते स्वतःहून विलगीकरणात गेले होते. ज्योतिरादित्य शिंदे व त्यांची आई यांच्या प्रकृतीविषयी उशिरापर्यंत कोणतेही निवेदन जारी करण्यात आले नव्हते.