ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे (७८) यांचे वृद्धापकाळाने दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते.
विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली. चार दशकांचा काळ उलटून गेला असला तरी कालियाच्या भूमिकेचे आजही स्मरण केले जाते.