ब्रेकिंग न्यूज़

जुळ्या बालिकांवर लैंगिक अत्याचार ः एकास अटक

पाच वर्षांच्या दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी बाळकृष्ण मापारी (राहणारा हणखणे) याला अटक केली.
बाळकृष्ण मापारी (वय वर्षे ३४, व्यवसाय ड्रायव्हर) याने पाच वर्षांच्या जुळ्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या मुलींच्या आईने पेडणे पोलीस स्थानकात दिल्यानंतर पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अल्बिटो रॉड्रिग्स यांनी या प्रकरणातील संशयित बाळकृष्ण मापारी याला सोमवारी अटक केली. संशयितावर भारतीय दंड संहिता कलम ३७ आयपीसी, ४, ८, १२ अंतर्गत लैंगिक अत्याचार तसेच गोवा बालकायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताने हे कृत्य १५ दिवसांपूर्वी केले होते. पीडीत मुलींच्या गुप्तांगात दुखायला लागल्यानंतर त्यांनी त्याची माहिती आपल्या आईला सांगितली. त्यानंतर या मुलीच्या आईने पेडणे पोलिसात तक्रार दिली.

संशयित तसेच पीडीत बालिकांना वैद्यकीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अल्बिटो रॉड्रिग्स यांनी दिली.