जीसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

गोवा तांत्रिक शिक्षण संचालनालयाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अशा तीन विषयांच्या घेतलेल्या गोवा सामान्य प्रवेश परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे.

अभियांत्रिकी आणि फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गौरव अवस्थी याने भौतिकशास्त्रात ७० आणि रसायनशास्त्र व गणित विषयात ७२ गुण घेऊन या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

निकालाची सविस्तर माहिती तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या माहिती फलकावर तसेच ुुु.वींश.सेर.र्सेीं.ळप या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेत सुमारे २९५४ उमेदवारांनी नोदणी केली होती.