जि. पंचायत सदस्याची गाडी सांताक्रूझमध्ये अज्ञातांनी फोडली

>> गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी

सांताक्रुझ येथे पार्क करून ठेवलेली जिल्हा पंचायत सदस्य जॉनी शेरावो यांची कारगाडीची अज्ञात व्यक्तीने मंगळवारी मध्यरात्री नासधूस केल्याने १ लाखांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर ली ब्रागांझा (बोंडीर-तिसवाडी) याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांताक्रुझ, कालापूर, मेरशी परिसरात काही महिन्यांपूर्वी अज्ञाताकडून नागरिकांच्या वाहनांची नासधूस केली जात होती. याविरोधात आवाज उठविण्यात आल्यानंतर वाहनाच्या नासधुशीच्या प्रकारात घट झाली होती.

सांताक्रुझ येथील पंचायत सदस्य प्रसाद नाईक यांनी मंगळवारी रात्री सदर कारगाडी सांताक्रुझ येथे पार्क करून ठेवली होती. या कारगाडीच्या बाजूला आणखी काही कारगाड्या पार्क केलेल्या होत्या. केवळ जिल्हा पंचायत सदस्य सुवारीस यांच्या कारगाडीची नासधूस करण्यात आली आहे. या परिसरातील गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी पंच नाईक व इतरांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, ओल्ड गोवा पोलिसांनी कारगाडीच्या नासधूस प्रकरणी एका व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.