ब्रेकिंग न्यूज़

जमीन विक्रीसाठी प्रक्रिया शुल्क जाहीर

नगरनियोजन कायदा १९७४ च्या कलम ४९ (६) अंतर्गत ना हरकत दाखल्यासाठी अर्जदारांकडून प्रक्रिया शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची सूचना नगरनियोजन खात्याचे मुख्य नगरनियोजक (प्रशासन) जेम्स मॅथ्यू यांनी जारी केली आहे. दोन हजार मीटर चौरस जागेसाठी १ हजार रुपये, २००१ ते ५००० मीटर चौरस जागेसाठी २ हजार रुपये आणि ५ हजारावरील मीटर चौरस जागेसाठी ३ हजार रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहेत. सरकारने जमिनीच्या विक्री खताच्या (सेल डीड) नोंदणीसाठी नगरनियोजन खात्याचा ना हरकत दाखला सक्तीचा केला आहे.