चोपडेत पर्यटकांच्या वाहनांची तोडफोड ः दोघांना अटक

चोपडेत पर्यटकांच्या वाहनांची तोडफोड ः दोघांना अटक

शिवोली-चोपडे पुलावरील रविवारच्या भीषण अपघाताच्या दुसर्‍याच दिवशी काल याच भागात चोपडे येथे पर्यटक वाहनाने ओव्हरटेक केले व त्यात दारुच्या बाटल्या आढळल्याने त्या अडवून स्थानिक वाहनातील युवकांनी पर्यटकांच्या वाहनांची तोडफोड करून त्यांना मारहाणही केली. अन्य एका पर्यटक वाहनातही दारू आढळल्याने त्याचीही तोडफोड करण्यात आली. पर्यटकांनी पेडणे पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी तुकाराम दाभोलकर (मोरजी) व सुलेन ढिल्लन भाईडकर (भाईडवाडा-कोरगाव) यांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मडकईकर यांनी दिली आहे.

याप्रकरणी आणखी काहींना अटकेची शक्यता मडकईकर यांनी व्यक्त केली. याबाबत वृत्त असे की काल चोपडे येथे दोन पर्यटक वाहने अडवून वाहनाची मोडतोड करून पर्यटकांना मारहाण केली. हे पर्यटक हैदराबादहून वागातोरला आले होते. काल ते शिवोलीमार्गे मोरजीला जाताना त्यांनी एका वाहनाला ओव्हरटेक केल्याने त्यांचे वाहन अडवण्यात आले. तेथील युवकांनी पर्यटकांना मारहाण केली. याचवेळी पुणे येथील पर्यटकांना घेऊन जाणार्‍या वाहनालाही अडवून त्यातील लोकांना मारहाण करण्यात आली.