ब्रेकिंग न्यूज़
चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसीला गोवा विभाग अजिंक्यपद

चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसीला गोवा विभाग अजिंक्यपद

गटफेरीतील शेवटच्या लढतीत धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला २-२ असे बरोबरीत रोखत चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाने एआयएफएफ अंडर-१५ यूथ लीग स्पर्धेचे गोवा विभागाचे राज्य अजिंक्यपद पटकाविले. या अजिंक्यपदाबरोबरच चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाने कोलकाता येथे होणार्‍या स्पर्धेच्या अखिल भारतय अंतिम फेरीसाठीही पात्रता मिळविली आहे.

जुने गोवे येथील एला मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात पहिल्या सत्रात कर्णधार मेवन डायसने चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाचे खाते खोलले होते. पहिल्या सत्रात त्यांनी आपली १-० अशी आघाडी राखली.
दुसर्‍या सत्रात नेसिओने पेनल्टीवर धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला १-१ अशी बरोबरी साधून दिली. धेंपोने श्रेयसच्या गोलमुळे २-१ अशी आघाडी मिळविली. तर लगेच पुढच्या मिनिटाला मेवन डायसने मॅकांझीच्या अचूक क्रॉसवर हेडरद्वारे गोल नोंदवित चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाला २-२ अशा बरोबरीसह गोवा विभाग जेतेपद मिळवून दिले.