गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले

>> व्हॅटमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ

राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) १५ ते २० टक्के आणि डिझेलवरील व्हॅट करात १५ ते १८ टक्के वाढ केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे.

पेट्रोलच्या दरात २ रुपये ७८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपया ६५ पैसे अशी वाढ झाली आहे. व्हॅटमध्ये वाढीमुळे पेट्रोलचा दर ६६ रुपये ५३ पैसे आणि डिझेलचा दर ६४ रुपये ९८ पैसे एवढा झाला आहे. व्हॅटच्या वाढीमुळे सरकारी तिजोरीत प्रतिमहिना १२.५ कोटी रुपयांचा महसूल जमा होण्यास मदत होणार आहे. वर्षअखेर सरकारी तिजोरीत अतिरिक्त १५० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.