गोव्यात पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शुक्रवार दि. २४ आणि शनिवार दि. २५ जुलै रोजी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली आहे.
राज्याला १६ ते १९ जुलै या काळात जोरदार पावसाने झोडपून काढले होते. मागील चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे.