ब्रेकिंग न्यूज़

गोव्याच्या फलंदाजांची हाराकिरी

पणजी (क्री. प्र.)
विजय मर्चंट सोळा वर्षांखालील दक्षिण विभागीय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोव्याने हैदराबादविरुद्ध वर्चस्वाची संधी काल गमावली. जीसीए अकादमी मैदानावर काल दुसर्‍या दिवशी गोव्याचा पहिला डाव १५३ धावांत संपला. हैदराबादला पहिल्या दिवशी १८७ धावांत गुंडाळल्यानंतर गोव्याला वर्चस्वाची संधी होती. परंतु, गोव्याची फलंदाजी कोलमडली. केवळ कौशल हट्टंगडी (५६), लखमेश पावणे (२५) यांनी थोडाफार प्रतिकार केला. हैदराबादकडून निखिलने ६ गडी बाद केले. दुसर्‍या दिवसअखेर हैदराबादने दुसर्‍या डावात १ बाद ३० धावा करत आपली आघाडी ६४ धावांची केली आहे.