गोव्याचा अरुणाचलवर १४७ धावांनी विजय

>> विनू मांकड अंडर १९ क्रिकेट स्पर्धा

विनू मांकड क्रिकेट स्पर्धेत काल मंगळवारी गोव्याने अरुणाचल प्रदेशचा १४७ धावांनी पराभव करत पूर्ण ४ गुणांची कमाई केली. पुदुचेरी येथे ही स्पर्धा सुरू आहे. गोव्याच्या २९२ धावांना उत्तर देताना अरुणाचलचा डाव १४५ धावांत संपला.

अरुणाचलने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर कर्णधार राहुल मेहता (६७) व कौशल हट्टंगडी (९३) यांनी दुसर्‍या गड्यासाठी १४५ धावांची मोठी भागीदारी रचली. दिगेश रायकरने ४८ धावांची मौल्यवान खेळी केली. तळाला पीयुष यादवने केवळ ९ चेंडूंत २५ धावा चोपत गोव्याला तीनशेच्या आसपास मजल मारून दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना अरुणाचलचे सात फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. यष्टिरक्षक जयप्रकाश यादवने ९१ धावा केल्याने त्याने शतकी वेस ओलांडणे शक्य झाले. गोव्याकडून हर्ष जेठाजीने ४ तर ऋत्विक नाईकने ३ गडी बाद केले. प्लेट गटात असलेल्या गोव्याचा हा सलग दुसरा विजय आहे. गोव्याने स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीत मेघालयचा १८४ धावांनी पराभव केला होता. गोव्याचा पुढील सामना गुरुवारी १० रोजी सिक्कीम संघाशी होणार आहे.

धावफलक
गोवा ः राहुल मेहता झे. जयप्रकाश गो. अनूप ६७, गौरेश कांबळी झे. शिवेंदर गो. सेरा ५, कौशल हट्टंगडी त्रि. गो. शिवेंदर ९३ (१२४ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार), दिगेश रायकर झे. हार्दिक गो. बग्रा ४८, आयुष वेर्लेकर मांकडिंग ११, मोहित रेडकर यष्टिचीत जयप्रकाश गो. खांबे १०, ऋत्विक नाईक त्रि. गो. खांबे ०, पीयुष यादव त्रि. गो. बग्रा २५, शुभम तारी झे. हार्दिक गो. बग्रा २, शादाब खान नाबाद ८, हर्ष जेठाजी नाबाद २, अवांतर २१, एकूण ५० षटकांत ९ बाद २९२
गोलंदाजी ः योर्जम सेरा ५-१-२३-१, बग्रा ७-०-४७-३, अनूप १०-०-५७-१, भारद्वाज १०-०-४४-०, शर्मा ८-०-५२-१, खांबे १०-०-६५-२
अरुणाचल प्रदेश ः तादार थॉमस झे. पीयुष गो. तारी १, दादो ताचुंग पायचीत गो. ऋत्विक ०, नाबाम कामा झे. मोहित गो. ऋत्विक ०, शिवेंदर शर्मा पायचीत गो. ऋत्विक ०, त्सेरिंग थापके त्रि. गो. जेठाजी ०, जयप्रकाश यादव पायचीत गो. शादाब ९१, अनूप पायचीत गो. जेठाजी ०, भारद्वाज त्रि. गो. जेठाजी २, बग्रा झे. कौशल गो. जेठाजी ०, खंबे झे. पीयुष गो. मोहित ३६, योर्जम सेरा नाबाद ०, अवांतर १५, एकूण ३९.२ षटकांत सर्वबाद १४५
गोलंदाजी ः शुभम तारी १०-३-२९-१, ऋत्विक नाईक ८-१-२४-३, हर्ष जेठाजी १०-१-२२-४, शादाब खान ७.२-१-२९-१, राहुल मेहता २-०-१८-०, मोहित रेडकर २-०-२२-१