गोवा वेल्हा अपघातात महिला जागीच ठार

 

गोवा वेल्हा येथे बगलमार्गाजवळ रुग्णवाहिका आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात स्कूटरस्वार महिला नीलिमा रायकर (५३, मालभाट) हिचे जागीच निधन झाले.
ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. मयत नीलिमा रायकर ह्या ऑल इंडिया रेडिओच्या कर्मचारी होत. आगशी पोलिसांनी या प्रकरणी रुग्णवाहिका चालकाला अटक केली.