ब्रेकिंग न्यूज़

गोवा विद्यापीठ पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती येणार

गोवा विद्यापीठाच्या फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाच्या कुलपती डॉ. मुदुला सिन्हा यांनी राष्ट्रपती कोविंद यांना वार्षिक पदवीदान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतींनी ते स्वीकारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यपाल डॉ. सिन्हा यांनी दिल्ली भेटीत राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेऊन गोवा सरकारच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, राज्यपाल डॉ. सिन्हा यांनी दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सरकारच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.