ब्रेकिंग न्यूज़

गोवर व कांजिण्या

  • वैदू भरत नाईक – कोलगाव

प्रास्ताविक
म्हटले तर गोवर व कांजिण्या हे क्षुद्र विकार. साथीचे व हवेतील आकस्मिक फेरबदलामुळे होणारे विकार आहेत. पण ज्यांना हे विकार होतात ती मुले अजाण व लहान असतात. त्यामुळे त्यांचे आईवडील मुलांच्या काळजीने घाबरून गेलेले असतात. त्यामुळे या विकारास निष्कारण महत्त्व देऊन हा विकार लांबविला जातो. योग्य व वेळेवर केलेले लहानसे उपचार हा विकार पुनःपुन्हा उद्भवत नाही.
एकेकाळी देवी हा भीषण विकार देशभर सर्वांनाच हैराण करत होता. त्यावेळेस देवी, गोवर, कांजिण्या या विकारांकरिता अंधश्रद्धेमुळे खेडोपाडी नाना दैवी उपचार करीत असत. आजही गोवर, कांजिण्यांसाठी खेडेगावात व काही अंशी शहरात दैवी उपाय चालू असतात. लहान मुलांच्या कल्याणाकरिता आयुर्वेदाच्या शास्त्रीय उपचारांची कास धरणे एवढेच या विकारात पुरेसे आहे.

कारणे ः
१) साथ असणे
२) लहान मुलांचा एकत्र संपर्कात रहाणे, एकमेकांचे कपडे वापरणे.
३) ताप असताना सौम्य स्वरूपातील चुकीची व तीव्र औषधे दिल्याने गोवर-कांजिण्यांची लक्षणे वाढणे.
४) खूप कडक उन्हात कफ व पित्त वाढण्याची कारणे.

लक्षणे
अ) गोवर ः
१) तीव्र, सौम्य ताप.
२) केसांच्या छिद्राइतका बारीक पुरळ अंगावर व डोक्यात उठतो.
३) खोकला, चैन न पडणे.
४) पुरळ उठण्यापूर्वी मसुराच्या डाळीएवढे डाग टाळूवर, गालावर, ओठांच्या आतील बाजूस येणे.
५) ताप येणे, थांबणे व परत येणे.

ब) कांजिण्या
प्रथम अंगावर पुरळ व नंतर ताप या क्रमाने सुरुवात होते. ह्या पुटकुळ्या प्रथम छातीवर व नंतर बाकी अंगावर येतात. कांजिण्या मोठ्या संख्येने येतात. फोड फार खोल नसतो. पाणी भरल्यासारखे फोड येतात. याला दुखणे किंवा खुपणे नसते. खपलीच्या ठिकाणी खाज येते, त्यामुळे पुन्हा फोड येतात. त्यामुळे त्याचे डागही रहातात. त्यामुळे पुन्हा ताप येऊ शकतो व क्वचित त्वचेतून रक्तस्राव होऊ शकतो. कांजिण्या एकदम येतात व एकदम जातात.

शरीर परीक्षण
१) टाळू, घसा, जीभ, डोळे, ओठ यांचे परीक्षण लाली कितपत वाढली हे ह्याकरिता करावे.
२) त्वचेवर उठलेले फोड किंवा लाल ठिपके, त्या फोडांतून पू किंवा लस आहे का याचे परीक्षण करावे.
३) ताप दिवसातून ३ ते ४ वेळा मोजावा.
आनुभविक उपचार
१) कालदुधा, प्रवाळ यांच्या प्रत्येकी २-२ गोळ्या दुधाबरोबर दोन वेळा घ्याव्यात.
२) गुलाब, द्राक्षासव३/४ चमचे समभाग पाण्याबरोबर २/३ वेळा घ्यावे.
३) शौचास साफ नसेल तर त्रिफळा चूर्ण १/३ चमचे व १ चमचा तूप असे रात्री घेणे.
४) फोडांना लावण्यासाठी शतधौतधृत वापरावे.
५) दाह होत असल्यास चंदन उगाळून लावावे.
६) गोवरामध्ये तीव्र ताप कशानेही कमी होत नसल्यास चंद्रकला व लसूण शेखर प्रत्येकी अर्धा गोळी याप्रमाणे अर्ध्यातासाने लागोपाठ पाच सात वेळा घ्यावी.
७) कांजिण्या व गोवर यामध्ये शरीराचा दाह होत असल्यास चंदन गंध व परिपाठ वाळून लेप लावावा.
८) कांजिण्याचे फोड खूप झाले असल्यास ते फोड गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने शेकून साफ करावेत व वर संत्र-जिर्‍याची पूड टाकावी म्हणजे लस पसरत नाही.

पथ्यापथ्य
१) गाईच्या दुधावर शक्यतो रहावे.
२) सालीच्या लाह्यांचा आहार किंवा त्यांचे पाणी उकळून प्यावे.
३) भरपूर काळ्या मनुका खाव्यात.
४) चंदन उगाळून त्याचे गंध पोटात घ्यावे.
५) तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण पदार्थ घेऊ नयेत.
६) धण्याचे पाणी किंवा पूड घ्यावी.
७) ओकारी असल्यास बर्फ घालून दूध घ्यावे.
८) ताप असल्यास अंग पुसून काढावे,