ब्रेकिंग न्यूज़
गोळावलीतील मृत वाघाची नखे सापडली

गोळावलीतील मृत वाघाची नखे सापडली

गोळावली सत्तरी येथे मृत झालेल्या वाघाची नखे गायब करण्याचा प्रकार घडला होता. ती वाघाची नखे काल मंगळवारी गोळावली गावातील श्री सातेरी केळबाय मंदिरात सापडली.

देवस्थानचे पुजारी देवगो खोत हे सकाळी साडेनऊच्या सुमाराम जेव्हा पूजा करण्यासाठी मंदिरात आले तेव्हा त्यांना मंदिरात प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी संशयास्पद दिसले. त्याची माहिती त्यांनी वनाधिकार्‍यांना दिली. वनाधिकारी नंदकुमार परब यांच्या मार्गदर्शनाखाली वन पथकाने मंदिरात जाऊन पाहणी केली असता मंदिरात दोन पिशव्यांत वाघाची नखे असल्याचे आढळून आले. वनाधिकार्‍यांनी त्याची माहिती वाळपई पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांना दिली. तसेच श्वान पथकाला बोलविण्यात आले. दुपारी दीड वाजता श्वानपथकाद्वारे तपासणी केली असता कोणताही पुरावा सापडला नाही. त्यानंतर अधिकार्‍यानी पंचनामा करून ती नखे ताब्यात घेतली.

मंदिरात सापडलेली नखे ही नर वाघाची असल्याचे सिद्ध झाले असून गोळावली जंगलात पहिला वाघिणीचा बछडा मृत झाला होता त्याचीच नखे असल्याचे तपासातअंति सिद्ध झाले.