गोमेकॉत ७ कोरोना संशयित दाखल

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित ७ रुग्णांना काल दाखल करण्यात आले. तर, गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेले ३८६ नमुने नकारात्मक आहेत.

गोमेकॉच्या कोरोना खास विभागात ५ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये १ रुग्ण आणि उपजिल्हा इस्पितळामध्ये २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य खात्याने २२९ जणांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेखाली आणले आहेत. राज्यातील ९ क्वारंटाईऩ केंद्रांमध्ये २३७ जणांना क्वारंटाईऩ करून ठेवण्यात आले आहे.