गोमेकॉत ३ कोरोना संशयित दाखल

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहेत.
आरोग्य खात्याने सरकारी क्वारंटाईनखाली १७६ जणांना आणले आहेत.

जीएमसीच्या कोविड प्रयोग शाळेत तपासण्यात आलेले ३४८ नमुने नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास विभागात ६ संशयितांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ३५१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ३४८ नमुने तपासण्यात आले असून ३ नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यातील क्वारंटा़ईन करण्यात येणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. दहा सरकारी क्वारंटाईऩ केंद्रात २८३ जणांना ठेवण्यात आले आहेत.