गोमेकॉतील एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया संशयास्पद ः कॉंग्रेस

कॉंग्रेस पक्षाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेबाबत संशय् व्यक्त केला आहे. एमबीबीएसमधील प्रवेशाबाबत तंत्रशिक्षण मंडळाने खुलासा करावा, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेत ईडब्लूएस विभागात गैरप्रकार करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आलेले नाही, दावा कॉंग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी केला आहे. वर्ष २०१२ मध्ये सुध्दा प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यावेळी प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने निकालात राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले होते, असेही डिमेलो यांनी सांगितले.

आर्थिकदृष्ट्या मागास विभागातील मुलांसाठी एमबीबीएससाठी खुल्या गटातून काही जागा राखीव ठेवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.