ब्रेकिंग न्यूज़
गोप्रेमींचा वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा
मोर्चात सहभागी गोप्रेमी

गोप्रेमींचा वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा

वाळपई भागात चाळीस गुरांची हत्या केल्याच्या निषेधार्थ काल गोप्रेमींनी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेला व गोवंश हत्यांर्‍याना कडक शिक्षेची मागणी करणारे निवेदन वाळपई पोलीस निरिक्षक संजय दळवी यांच्याकडे सादर केले.पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात गोवंश हत्याराना कोर्टाकडून जामीन न मिळण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे. गोहत्या प्रकरणी सखोल चौकशी करावी. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यावर तसेच गोवंश विकलेल्याना ताब्यात घ्यावे व सत्तरी भागात रविवारी गोमांस विकले जाते ते संपूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे. मोर्चात गोरक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब, दक्षिण गोवा बजरंग दल प्रमुख दत्ता सांगेकर, प्रकाश गाडगीळ, लक्ष्मण जोशी, पवन बर्वे, शांता मणेरकर, पतंजली योग समितीचे प्रमुख कमलाकांत तारी, नारायण बर्वे, विश्‍वेस परोब सहभागी झाले होते.

Leave a Reply