गायक दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल

सुप्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी काल केंद्रीय मंत्री विजय गोयल व दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे लोकसभा उमेदवार तथा सुफी गायक हंसराज हंस व केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन हेही यावेळी उपस्थित होते. हंस यांच्या मुलाशी मेहंदी यांच्या मुलीचा विवाह झाला आहे.