ब्रेकिंग न्यूज़

गंडमाळा

  •  वैदू भरत म. नाईक, कोलगाव

गंडमाळाचे गांभीर्य लोक लक्षात घेत नाहीत. विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्टीत कामगार वनस्पती याचे प्रमाण वाढत आहे. गंडमाळा म्हणजे क्षयच होय. त्यामुळे लहान मुलामुलींची वाढ होणे थांबते. मोठ्या वयाच्या बायका झिजून झिजून भोगत राहतात. स्ट्रॉंग औषधे, इंजेक्शन यांचे चक्र मुंबई सारख्या शहरात संपतच नाही. आयुर्वेदात अमरकंद, कांचन साल, चुन्याची निवळी वापरून ते लक्ष्मी विलास, सुवर्णमालिनी, वसंत अशी रंकांपासून रावांपर्यंत सर्वांना परवडणारी स्वतः महाग पण निश्‍चितच टिकाऊ स्वरूपाचे काम करणारी खूप औषधे आहेत, पण लक्षात कोण घेतो?

कारणेः
१) शरीराच्या पोषणास आवश्यक असणारे घटक असलेल्या अन्नाचा एकूण आहारात अभाव असणे.
२) खूप श्रम होऊन शरीराची झीज होणे व त्याप्रमाणात शरीराचे आवश्यक पोषण न होणे.
३) सर्दी, पडसे, ताप, खोकला यांनी शरीरात ठाण मांडून बसणे.
४) कुपोषण किंवा शिळे अन्न, गार अन्न, दूषित अन्न याचा सातत्याने वापर.
५) क्षयाची बाधा असणार्‍याजवळ लहान मुलांनी सतत बसणे/झोपणे.

लक्षणे ः
१) कानाच्या मागून खाली गळ्याकडे दोन्ही बाजूस खाली एक व अनेक गाठी लहान मोठ्या आकाराच्या लागणे. २) सुरुवातीच्या अवस्थेत गाठी येणे व जाणे नंतर दीर्घकाळ स्थिर सूज वाढणे. ३) अधून मधून ताप येणे, पुढे पुढे तोही ठरावीक दिवस येणे व तोही टिकून राहणे. ४) हळूहळू वजन घटणे, ५) चेहरा भकास वाटणे, ६) कृमी, जंत, टॉन्सिल्स, मलावरोध, अतिसार, अग्निमांद्य ही लक्षणे असणे.

शरीर परीक्षण ः
मानेभोवती व मानेच्या मागे गळ्याकडे गाठींकरता तपासून पाहणे, टॉन्सिल्सची वाढ, घसा, कृमी व जंत याकरिता जीभ पाहणे आवश्यक आहे. शरीराचा स्पर्श ५ कडकी करिता व ताप आल्यास तापाचे प्रमाण व काळ यांची नोंद करावी. भूक, रुची, आहार व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वजन यावर लक्ष हवे.

आनुभविक उपचार
१) आरोग्यवर्धिनी, कांचनार, त्रिफळा गुगुळ, प्रत्येकी तीन-तीन गोळ्या बारीक करून पाण्यातून सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्याव्यात. २) नेहमी ताप येत असल्यास लघुमालिनी वसंत, लक्ष्मीनारायण, चंद्रकला या गोळ्या अवस्था बघून घ्याव्यात. ३) वजन कमी होत असल्यास शतावरी कल्प, च्यवनप्राश, शतावरी धृत, अश्‍वगंधापाक, अश्‍वगंधा चूर्ण अशी वजन वाढवणारी टॉनिक्स घ्यावीत. ४) गंडमाळ वाहत असल्यास लक्षादिधृत, मबातिक्तधृत अशी विरुद्ध धृते घ्यावीत. ५) खोकला, सर्दी, पडसे वारंवार असल्यास चौसष्ट पिंपळी मधातून देणे, ६) भूक व पचन मंद असल्यास द्राक्षासव, पिपलासव, व दशमूलारिष्ट यापैकी एक घ्यावे. ७) पांडूता हे लक्षणे असल्यास चंद्रप्रभा, आरोेग्यवर्धिनी, सुवर्णमाक्षिकादिवटी, चंद्रकला यातील औषधे घ्यावीत.

पथ्यापथ्य
१) या विकारावर वजन खूपच कमी असेल तर सामान्य पथ्यापथ्य करावे. नियम न लावता जे आवडेल व जे ताजे मिळेल ते सर्व खावे. कारण अन्नाची रुची यांना महत्त्व असून त्यामुळे खाल्लेल्या प्रत्येक अन्नकणाचे शरीर बृहण करीत असते. पोटभर अन्न पोटात जाणे आवश्यक आहे. २) गहू, शेंगदाणे, बटाटा, कांदा, मांस, अंडी, तूप, दूध, फळे, साखर, साखरेचे पदार्थ यांचा आहारात मुक्तपणे सहभाग नसावा. ३) लोणची, मिरची, पापड, शिळे अन्न, मटकी, पालेभाज्या याचा वापर शक्यतो टाळावा.