खासदार सुब्रमण्यम स्वामींविरोधात कॉंग्रेसची पणजी पोलिसांत तक्रार

>> राहुल गांधींच्या बदनामीचा आरोप

राहुल गांधी यांची बदनामी केल्या प्रकरणी गोवा प्रदेश युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांच्याविरुद्ध पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हार्दोळकर यांनी तक्रार केल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ७ जुलै रोजी स्वामी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी हे अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा आरोप केला होता. स्वामी यांनी केलेल्या ह्या आरोपांमुळे गांधी यांची बदनामी होण्याबरोबरच त्यांच्याविषयी जनतेमध्ये द्वेष भावनाही निर्माण होण्याची शक्यता असून तणाव निर्माण होऊ शकतो, असे म्हार्दोळकर म्हणाले.