खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करा

>> विनय तेंडुलकर यांची संसदेत मागणी

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल संसदेत गोव्याच्या खाणीचा मुद्दा उपस्थित करताना राज्यातील बंद पडलेल्या लोह खनिज खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती घडवून आणावी, अशी मागणी केली. राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने खाणींवर अवलंबून असलेल्या राज्यातील ७५ हजार कुटुंबांवर थेट परिणाम झाला असल्याचे त्यांनी सभागृहाचा नजरेस आणून दिले. खाणअवलंबित लोकांची आर्थिक परिस्थिती एवढी हलाखीची झाली आहे की त्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठीची फी सुध्दा भरता येत नसल्याचे तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले.