ब्रेकिंग न्यूज़

खाणप्रश्‍नी सुप्रिम कोर्टात लवकरच हस्तक्षेप याचिका

>> नीलेश काब्राल यांची माहिती

राज्यातील खाण उद्योग सुरू करण्यासाठी भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका नव्हे तर हस्तक्षेप याचिका सादर करणार असल्याचे काल आमदार नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी नेमके काय करण्याचा सरकारचा विचार आहे, असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. मात्र, आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येईल, असे सरकारतर्फे सांगितले जात असे. काल पहिल्यांदाच नीलेश काब्राल म्हणाले, की सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार नसून हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. खाणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात न जाता जर आम्ही थेट संसदेत खाणी सुरू करण्यासंबंधीचा अध्यादेश काढला तर काही बिगर सरकारी संघटनांसह इतरांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे काब्राल म्हणाले.