खाणप्रश्‍नी चर्चेस मुख्यमंत्री अनुकूल

राज्यातील खाणींच्या प्रश्‍नावर विधानसभेत चर्चा घडवून आणण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल अनुकूलता दर्शविली. या प्रश्‍नावर विधानसभेत एका तासाची चर्चा घडवून आणावी अशी मागणी आमदार प्रमोद सावंत यांनी केली होती. नीलेश काब्राल व अन्य काही आमदारांनीही चर्चा घडवून आणण्याची मागणी यावेळी केली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याला अनुकूलता दर्शविली. खाणींचा प्रश्‍न हा जटील असून त्यावर चर्चेसाठी दोन तासही कमीच असल्याचे पर्रीकर म्हणाले. खाणींच्या प्रश्‍नावर आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाला पावणे दोन वर्षे काढली होती. अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आपणाला सहा महिन्यांचा अवधी दिला असल्याचे ते म्हणाले. आता किती खनिज काढता येईल ती मर्यादा, पर्यावरण दाखले आदी विषय असून ही कामे हातावेगळी करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

 

Leave a Reply