खाणग्रस्तांनी घेतली खासदार सार्दिनची भेट

खाणग्रस्त लोकांनी काल दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची भेट घेऊन खाणी बंद झाल्याने खाण अवलंबीत लोकांना फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याची कल्पना दिली व दिल्लीत खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

दोन दिवसांमागे त्यानी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांची भेट घेतली होती. त्यांनी येत्या विधानसभा अधिवेसनगत आवाज उठविण्याचे आश्‍वासन दिले. काल त्यांनी दक्षिण गोव्याचे खासदार यांची भेट घेतली. खासदार सार्दिन यांनी आपण येत्या लोकसभा अधिवेशनात गोव्यातील खाणी सुरू करण्यासंबंधी प्रश्‍न विचारणार असल्याचे सांगितले. भाजप सरकारने खाणी बंद करून सर्वसामान्य लोकांचे हाल केले आहेत याची जाणीव आहे. आपण दिल्लीत लोकसभेत आवाज उठविन व संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करण्याचे आश्‍वासन खासदार सार्दिन यांनी खाणग्रस्तांना दिले.