ब्रेकिंग न्यूज़

क्लॉड आल्वारीस अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात

येथील खाण व भूगर्भ खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी गोवा फाउंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारिस यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात काल अर्ज केला. आल्वारिस यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी काल बुधवार दि. २० रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. आल्वारिस यांनी चौकशीसाठी उपस्थित न राहता जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

क्लॉड आल्वारिस आणि राहुल बसू यांनी १३ मे २०१८ रोजी खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकून चावी पणजी पोलीस स्टेशनवर दिली होती. या प्रकरणी सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी पणजी पोलीस स्टेशनवर तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी क्लॉड आल्वारिस व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.