कोविड निधीला मंत्री देणार महिन्याचा पगार

राज्यातील मंत्र्यांनी आपल्या एक महिन्याचा पगार कोविड-१९ निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या खास बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने कोविड-१९ निधी निधी संकलन सुरू केले आहे. या निधीचा वापर कोरोना उपचारासाठी साधन सुविधा उपलब्ध करण्यावर केला जाणार आहे. राज्यातील आयएएस, आयएफएस आणि आयपीएस अधिकारी कोविड-१९ निधीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे योगदान देणार आहेत.  राज्य सरकारमधील इतर अधिकारी स्वच्छेने आर्थिक योगदान देणार आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातून निधी संकलन केले जात आहे, असेही सरकारी सूत्रांनी सांगितले.