ब्रेकिंग न्यूज़
कोलोरेक्टल कर्करोग

कोलोरेक्टल कर्करोग

वैद्यकशास्त्रात कोलोरेक्टल कर्करोगामध्ये उपचार सुरु करण्यापूर्वी त्याचे निदान करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. एकदा निदान झाले की गाठीची अवस्था, त्याचे स्थान व प्रसार पाहून त्याप्रमाणे मोठे आतडे शस्त्रक्रिया करून संपूर्ण अथवा त्याचा काही भाग काढला जातो.
——————————–
——————————–

बर्‍याच कोलोरेक्टल कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया केल्यावर पहिल्या ४ वर्षात व्याधीचा पुनरुद्भव होतो. ५ वर्षांचा जगण्याचा दर हा ह्या कर्करोगात कर्करोगाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. ५ वर्षे जगण्याच्या दरामध्ये गेल्या १० वर्षात बरीच सुधारणा झालेली आढळते. ह्यात फक्त स्थानिक लसिका ग्रंथींमध्ये व्याधीचा प्रसार झाला आहे की नाही एवढेच महत्वाचे नसून स्थानिक किती लसिका ग्रंथींमध्ये व्याधी पसरला आहे ह्यावर देखील रुग्णाचे ५ वर्षे जगणे अवलंबून असते.
शस्त्रक्रिया करून ५ वर्षांच्या आत जेव्हा रोगाचा पुनरुद्भव होतो तेव्हा शस्त्रक्रिया करताना मोठ्या आतड्यातील गाठ ही किती खोलवर प्रसार पावली आहे, तसेच गाठ तपासणीमध्ये काही क्लिष्टता आढळते का? गाठीमुळे आतड्याला भोक पडले आहे का? किवा ती गाठ अन्य भागातील अवयवांना चिकटली आहे का? …. हे पाहणेदेखील आवश्यक ठरते. ‘सीई’ ह्या रक्ताच्या चाचणीद्वारे देखील कर्करोगाचा पुनरुद्भव झाला आहे किंवा नाही हे समजणे सोपे जाते. काही जनुकांमध्ये झालेले विकृत बदल हेदेखील ह्या कर्करोगाच्या वाढ व प्रसार ह्यात महत्वाचे ठरतात.
मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रसार जेव्हा होतो तेव्हा तो स्थानिक लसिका ग्रंथी मधून थेट यकृतात पसरतो. १/३ कोलोरेक्टल कर्करोगाचा प्रसार हा प्रथम यकृतातच होतो. तसेच कोलोरेक्टल कर्करोगएमुळे मरण पावणार्‍या २/३ लोकांमध्येदेखील मृत्यूचे कारण हे व्याधीचा प्रसार यकृतात होणे हेच असते. ह्या कर्करोगाचा प्राथमिक प्रसार हा फुफुस, गळयाजवळील लसिका ग्रंथी, मेंदू ह्यात आढळत नाही. पण जर रुग्णामध्ये मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागात जर प्राथमिक गाठ आढळली असेल तर मात्र पाठीच्या कण्यातील रक्तवाहिनी जाळ्यातून त्याचा प्रसार होतो आणि यकृतामध्ये प्रसार आढळत नाही. ह्या अवस्थेत एकदा का हा कोलोरेक्टल कर्करोग अन्य भागात पसरला की पुढे रुग्णाचे आयुर्मान हे ६-९ महिने ते २-२१/२ वर्षे एवढे असते. पण हल्ली होत असलेल्या नवीन संशोधनांमुळे हे आयुर्मान अजून वाढले आहे.
आता आपण ह्या कर्करोगाचे उपचार पाहूयात :
वैद्यकशास्त्रात कोलोरेक्टल कर्करोगामध्ये उपचार सुरु करण्यापूर्वी त्याचे निदान करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. एकदा निदान झाले की गाठीची अवस्था, त्याचे स्थान व प्रसार पाहून त्याप्रमाणे मोठे आतडे शस्त्रक्रिया करून संपूर्ण अथवा त्याचा काही भाग काढला जातो. जर लसिका ग्रंथीमध्ये रोग पसरला असेल तर शस्त्रक्रिया करून त्यादेखील काढल्या जातात. त्याचप्रमाणे संपूर्ण उदर गुहेचे परीक्षण करून त्यातील सर्व अवयवांचे नीट परीक्षण करून त्यात व्याधी पसरला आहे की नाही तेदेखील तपासले जाते.
एकदा शत्रक्रिया झाली की पुढे ५ वर्षे वर्षातून २ वेळा त्या रुग्णाची सखोल तपासणी केली जाते. ह्यात रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी, लीं स्कॅन, क्ष-किरण तपासणी देखील करतात. ज्या रुग्णाचा मोठ्या आतड्याचा काही भाग शिल्लक आहे त्यांची कोलोनोस्कोपीदेखील करतात. शस्त्रक्रियेसोबतच काही रुग्णांना मध्ये शस्त्रक्रियेपूर्वी अथवा नंतर रेडिएशन थेरपीदेखील दिली जाते. रेडिएशन दिल्याने त्या भागातील कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात व पुढे रोगाचा पुनरुद्भव बर्‍याच प्रमाणात टाळला जातो.
शस्त्रक्रिया व रेडिएशन थेरपी ह्यासोबतच रुग्णाला किमोथेरपीदेखील देतात. ही किमोथेरपी आणि रेडिएशन थरेपी सोबत अथवा शस्त्रक्रियेनन्तर दिली जाते.
अर्थात हे वरील सर्व उपाय करताना रुग्णाचे वय, रोगाची अवस्था, रुग्णाची शारीरिक स्थिती ह्या गोष्टीदेखील ध्यानात घेऊन मगच त्याप्रमाणे त्याच्यावर केले जाणारे उपचार ठरवावे लागतात.
आता कोलोरेक्टल कर्करोगापासून स्वतःचा बचाव कसा करावा?… ते आपण जाणून घेऊयात :
त्यासाठी आपण सर्वांनी खालील गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे :
१) शरीर स्थूलता वाढू देऊ नये.
२) नियमित व्यायाम करावा.
३) अति प्रमाणात मांसाहार सेवन टाळावे.
४) अति प्रमाणात फास्टफूड, जंकफूड, रिफाईन्ड पीठे वापरू नये.
५) दारू, सिगारेट, तंबाखू ह्यांचे व्यसन टाळावे.
६) जेवणामध्ये योग्य प्रमाणात भाज्या, फळे, कडधान्ये ह्यांचा समावेश असावा.
७) आठवड्यातून एक दिवस हलका आहार सेवन करून उपवास अथवा लंघन करावे.
८) अति प्रमाणात मानसिक ताण व शारीरिक दगदग टाळावी.