कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०७

>> नवीन २० पॉझिटिव्ह, एकूण ११८ जण कोरोनामुक्त

राज्यात काल नवीन २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ६०७ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ७२५ झाली असून आत्तापर्यंत ११८ रुग्ण बरे झाले आहेत.

चिंबलमध्ये नवीन २ रुग्ण
इंदिरानगर चिंबलमध्ये आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. इंदिरानगर भागातील एका जोडप्याला कोरोना विषाणूची बाधा झाली होती. शिरेन चिंबल येथे २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. चिंबलचा भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

आंबावलीत आणखी ५ रुग्ण
आंबावली चिंचिणी येथे आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६ झाली आहे. इथे गुरूवारी एक कोरोना पॉझिटिव्ह आयसोलेटेड रुग्ण आढळला होता.

कुडतरीत नवीन २ रुग्ण
कुडतरी येथे २ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कुडतरीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली आहे. मडगाव, बेती येथे आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सडा आणि बायणा वास्को येथे आणखी प्रत्येकी १ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. मांगूर हिल आणि मागूर हिलाशी संबंधित नवीन रुग्ण काल आढळून आलेला नाही.

गोमेकॉत ८ संशयित
जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात ८ संशयितांना दाखल करण्यात आले असून १२ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत.