केपे कोविड केंद्र रद्द ः कवळेकर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर केपे येथील सरकारी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री, केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी काल दिली. केपे येथील सरकारी महाविद्यालय कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी जारी केला होता. केपेतील सरकारी महाविद्यालयात कोविड केंद्र सुरू करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री कवळेकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.