केंद्राकडून गोव्याला १०९३ कोटींचा निधी

केंद्र सरकारने वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जीएसटी नुकसान भरपाईपोटी गोवा राज्य सरकारला १०९३ कोटी रूपयांचा निधी हस्तांतरित केला आहे.

केंद्र सरकारने देशात जीएसटी कायदा लागू केल्यानंतर राज्याना होणारे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ३१ राज्यांना १६५३०२ कोटी रूपयांच्या निधीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या निधीमुळे राज्य सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.