कॅसिनोंच्या आग्वाद स्थलांतरास विरोध

मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो आग्वाद येथे स्थलांतरित करण्यासाठी विरोध वाढत आहे. कळंगुट मतदारसंघ मंच, कांदोळी नागरिक कृती समिती आणि पिळर्ण नागरिक मंचाच्या पदाधिकार्‍यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅसिनोच्या आग्वाद बे येथे स्थलांतराला गुरूवारी विरोध दर्शविला आहे. सरकारी यंत्रणेकडून मांडवी नदीतील काही कॅसिनो आग्वाद बे येथे स्थलांतरित करण्यासाठी चाचपणी केली जात आहे. कॉंग्रेस पक्षाने कॅसिनोच्या आग्वाद बे येथे स्थलांतराला पहिल्यांदा विरोध केला आहे.