कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आयसीजेकडून स्थगिती

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीप्रकरणी भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या निवाड्याला काल आयसीजी तथा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली. या विषयीचा निकाल १५-१ अशा फरकाने भारताच्या बाजूने लागला आहे. याआधी २०१७ मध्ये या न्यायालयाने फाशीच्या निवाड्याला पहिल्यांदा स्थगिती दिली होती, ती आता कायम करण्यात आली आहे.

दक्षिण आशियाच्या आंतरराष्ट्रीय कायदा सल्लागार रिमा ओमर यांनी याविषयी माहिती दिली आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावलेल्या आरोपांना आयसीजीने योग्य ग्राह्य धरलेले नाही. गेली गेली दोन वर्षे २ महिने आयसीजेमध्ये १५ सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी चालली होती. पाकिस्तानकडून जाधव यांना कोन्सुलर ऍसेस देण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकने जाधव यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या फेरविचार करावा. त्याविषयी फेरविचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशी स्थगित करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच जाधव यांना कोन्सुलर ऍसेस देण्यात यावा असेही आयसीजीने म्हटले आहे.