किडनीचा कर्करोगकिडनीचा कर्करोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
व्याधिप्रतिकारशक्ती कमी होणे हेच व्याधीचे मूळ असल्याने कॅन्सरमध्ये व्याधिक्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर होय. यासाठी तांदूळ भाजून भात, भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका. ज्वारीची भाकली, मुगाचे वरण, शिरा, पडवळ, कोबी, दुधी, भेंडी, दोडका, तांदूळजा यासारख्या भाज्या पथ्यकर.
कि  डनी किंवा रीनल कॅन्सरचा विचार केल्यास संख्यातः    महिलांपेक्षा पुरुषांना हा कॅन्सर होण्याची शक्यता    जास्त असते. तसे पाहता हा कॅन्सर कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो पण उतार वयात याची लागण जास्त प्रमाणात होते. चाळीस वयावरील वयोगटात हा जास्त आढळतो. साधारणतः मनुष्याच्या शरीरामध्ये दोन किडन्या असतात व त्या मागील बाजूस बरगड्यांखाली असतात. किडनीचे मुख्य कार्य रक्त शुद्ध करून बाहेर पडणारा मळ मूत्ररूपात परिवर्तीत करणे. हे मूत्र मूत्राशयात संचित केले जाते व मूत्रत्यागाच्या वेळी मूत्रमार्गाने बाहेर फेकले जाते. किडनी हे मनुष्य शरीरातील महत्त्वाचे अंग होय. रक्तशुद्धीकरणाबरोबर किडनी शरीरातील द्रव, धातू, खनीज, एवं क्षारांवर नियंत्रण ठेवून रक्तदाबावर नियंत्रण ठेवते. किडनीचा कॅन्सर म्हणजे वृक्काचा मुलभूत ऊती व संधारकोश या दोहोंमध्ये अनियमित वाढ होऊन गाठ निर्माण होते. बर्‍याच वेळी किडनीच्या कर्करोगाचे निदान इतर अवयवात या व्याधीचा प्रसार होण्यापूर्वी होते म्हणूनच याची चिकित्सा योग्य वेळेस झाल्यास कॅन्सरमध्ये सफलता मिळू शकते.किडनीच्या कर्करोगाची संभाव्य कारणे -किडनीच्या कर्करोगाची तशी नेमकी कारणे सांगता येत नाही. पण खालील काही कारणे या कर्करोगाला प्रभावित करतात.  * धूम्रपान – अत्यधिक काळापासून धूम्रपान. * तंबाखू सेवन – दीर्घकाळ. * रंग, चामडे, प्लॅस्टिक, छपाई व्यवसायांशी दीर्घकाळ संपर्क * चाळीशीच्या वरील वय. * लठ्ठपणा  * हायपरटेन्शन किंवा उच्चरक्तदाब असणार्‍या व्यक्ती ज्यांचे    औषध सेवन अनियमित असते. * रूग्ण डायलिसीसवर असल्यास * आनुवंशिकता.किडनीच्या कर्करोगातील सामान्य लक्षणे – किडनीच्या कर्करोगात मोठी लक्षणे अशी सर्वप्रथम आढळत नाही. बर्‍याच वेळा लघवीला त्रास, कटीप्रदेशी वेदना, सरक्त लघवी अशा प्रकारची सौम्य लक्षणे दिसतात. रुग्ण व डॉक्टरही ‘युरीन इन्फेक्शन’ म्हणून उपचार करतात. अशा लक्षणांवरून किडनीच्या कर्करोगाचे निदान होत नाही. म्हणून बर्‍याच तपासण्या केल्याशिवाय किडनीच्या कॅन्सरचे निदान केले जात नाही. * पोटात किडनीच्या जागेवर वाढत जाणारा त्रास, वजन कमी होणे, सतत ताप ही लक्षणे वृक्काच्या कर्करोगात सामान्यतः दिसतात.* सरक्त मूत्रप्रवृत्ती हे प्राथमिक लक्षण असते. मूत्रविसर्जन करण्यास अवरोध झाल्यास कटिरात साठलेल्या मूत्राचा दाब किडनीवर पडून किडनीमध्ये रक्तस्राव होतो. त्यामुळे उत्पन्न होणारा अवरोध स्पर्श परीक्षणात समजतो. * स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण दुपटीने जास्त असते. प्रारंभी अधूनमधून सरक्त मूत्रप्रवृत्ती व नंतर रक्ताचे स्कंदन झाल्याने स्कंदित रक्त मूत्राशयातून उतरताना वेदना उत्पन्न होतात.* पाठीमागे ओढल्याप्रमाणे वेदना होतात.* स्पर्श परिक्षणात तेथे क्वचित वेदना आढळते.* काही रुग्णांमध्ये आढळणारे परंतु व्याधिविनिश्‍चयाला अत्यंत उपयुक्त ठरणारे लक्षण म्हणजे वृषण प्रदेशी सिराजग्रंथी उत्पन्न होणे हे होय. * काही वेळा गाठीचा प्रसाल अन्य अवयवांत होऊन अस्थिवेदना, वृद्धी किंवा भग्न तसेच कास, सरक्तता, इ. लक्षणे घेऊन रुग्ण येतो व त्यावेळी किडनीच्या गाठीचे निदान होते.* क्वचित १०० ते १०१ डिग्रीपर्यंत ताप असतो. * तीव्र पांडू (ऍनिमिया) हे लक्षण सरक्त मूत्रप्रवृत्तीमुळे उत्पन्न होते.* मूत्रोत्सर्गाची घाई होणे* वारंवार मूत्रप्रवृत्ती* मूत्रप्रवृत्तीच्या वेळी पोटात वेदना जाणवणे.* पायांवर व जननेंद्रियांवर सूज. किडनीच्या कर्करोगावरील चिकित्सा व उपचार -व्याधीचा प्रसार अन्यत्र झाला नसेल तर विकृत किडनी मेदासह काढून टाकावी.नंतर क्ष-किरण रेडिओथेरपी घ्यावी. शस्त्रकर्म अशक्य असल्यास केवळ रेडिओथेरपी घ्यावी. शस्त्रकर्मानंतर काही रुग्ण पूर्णपणे बरे होतात. तसा कॅन्सर हा व्याधी चिकित्सेस कठीण जरी असला तरी आयुर्वेद चिकित्सेने व्याधीवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. शोधन, शमन व रसायन चिकित्सेने व्याधीची चिकित्सा करता येते. व्याधी निर्माण करणार्‍या दोषांची वृद्धी अधिक प्रमाणात असल्यास रुग्णाचे बल उत्तम असल्यास शोधनचिकित्सा द्यावी. या व्याधीत बस्ति या शोधन उपक्रमाचा उपयोग दोष बाहेर काढण्यास होतो. स्नेहन – स्वेदनपश्‍चात औषधी तेल/तूप किंवा औषधी काढ्यांच्या मदतीने गुदमार्गातून अनुवासन किंवा निरुह बस्ति देता येते. शोधनानंतर जाठराग्नी मंद झालेला असतो. म्हणून सुरवातीला पचनास हलकी अशी पेज देऊन क्रमाक्रमाने विलेपी, यूष, मांसरस भरून गुरु आहार देत शेवटी पूर्ण आहाराला सुरवात करावी.शोधन चिकित्सा घेण्यास रुग्णाचे बळ चांगले नसल्यास शमन चिकित्सेचा वापर केला जातो. यामध्ये सारिवा, त्रिफळा, गोक्षुर, शतावरी, वरुण, अश्‍वगंधासारखा एकेरी द्रव्यांचा वापर केला जातो. तसेच हिंग्वाष्टक चूर्ण, सूक्ष्म त्रिफळा, आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ, गोक्षुरादि गुग्गुळसारख्या कल्पांचा वापर केला जातो.षंडगोदकासारखी सिद्ध जल, गुडूची सिद्ध दुग्ध, शतावरी कल्प, निंब तेल, यष्टिमधु तेल, यष्टीमधु घृत अशी सिद्ध घृत व तैल, बाह्यप्रयोगासाठी चंदनबलालाक्षादि तेल, बदाम तेल अशी अभ्यंग तैलं शोथहर लेप, चंदन लेप, यांचा वापर कॅन्सरच्या प्रकार व अवस्थेनुसार केला जातो.अनुषंगिक उपक्रमामध्ये अवगाह स्वेदाचा विशेष उपयोग होतो. यामध्ये रुग्णाला टबमध्ये किंचित उष्ण औषधी काढा घालून त्यात बसविले जाते. यामुळे वाताचे अनुलोमन होते व स्थानिक वेदना कमी होतात. रसायन चिकित्सा – कॅन्सरमध्ये रसादि सात धातू व त्यांचे अग्नी यांची विकृती असते. त्यामुळे कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादि सात धातूंना बल देणारी रसायन चिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते. यात दूध, तूप, साळीचा भात यासारख्या सात्विक रसायन आहार, शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्म यासारखी रसायन औषधे वापरावीत.पथ्यापथ्य – व्याधिप्रतिकारशक्ती कमी होणे हेच व्याधीचे मूळ असल्याने कॅन्सरमध्ये व्याधिक्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर होय. यासाठी तांदूळ भाजून भात, भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका. ज्वारीची भाकली, मुगाचे वरण, शिरा, पडवळ, कोबी, दुधी, भेंडी, दोडका, तांदूळजा यासारख्या भाज्.या पथ्यकर. कॅन्सरमध्ये गोड द्राक्षे, गोड डाळिंब, सफरचंद, पपई, अंजीर, खजूर, जर्दाळू पथ्यकर.अस्थिमध्ये कॅन्सर पसरल्यास मटन सूप, चिकन सूप लाभदायक. द्रवपदार्थांपैकी गाईचे दूध – सुंठ व हळद घालून, गोड, ताजे ताक – जिरेपूड, सौंधव घालून घ्यावे.गाईचे तूप, ताजे लोणी बल वाढविण्यासाठी लाभदायक. किडनी, मूत्राशयातील गाठी असल्यास मूत्रमात्रा कमी होणे, मूत्रदाह अशी लक्षणे असल्.यास नारळाचे/शहाळाचे पाणी, धने-जिर्‍याचे पाणी रोज सेवन करावे.उकळलेले कोमट पाणी नित्य वापरात असावे.व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी सुवर्ण श्रेष्ठ असल्यामुळे सुवर्णसिद्ध जल वापरावे.रुग्णाचे बल उत्तम असल्यास मोकळ्या हवेत फिरणे. योग-प्राणायाम साधना करणे.तिखट, मसालेदार, चटपटीत, बेकरी उत्पादने, शीतपेये, फ्रीजचे पाणी, खेळाचे शिकरण, मिल्कशेक्स, दूध व मांसाहार, पचण्यास जड पदार्थांचे सेवन करू नये.धूम्रपान व तंबाखू सेवन पूर्ण वर्ज्य करावे. मल-मूत्रादि वेगांची धारणा करू नये.मूत्रवह संस्थेशी संबंधित कॅन्सर ः प्रतिबंध – बस्ति उपक्रम (तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली)- आहारविधी नियमांचे पालन- मूत्रवेगावरोध करू नये.